|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
बरेच दिवसांनी लेख लिहायला उसंत मिळाली. दरम्यान
नेहमीप्रमाणे लेख लिहिण्यासाठी जातकांच्या मागण्या सुरूच होत्या. असो.
पत्रिकेतील ग्रहयोगावरून व्यक्तीच्या स्वभावाचा,
आवडीनिवडीचा, विचारांचा उत्तम अंदाज येऊ शकतो. ज्याला पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणतात,
ते पत्रिकेवरून उत्तम कळू शकतात. मागच्या लेखात हे नमूद केले होते. आजचा लेख एका
परिचित महिलेवर आहे. जन्मतपशील गोपनीयतेच्या कारणास्तव दिलेले नाहीत. शास्त्र
समजण्यापुरती कुंडली दिली आहे. ज्यांचा ज्योतिषाचा उत्तम अभ्यास आहे, ते या
पत्रिकेवरून जन्मतारीख काढतील. ती त्यांनी काढावी.
ही कुंडली आमच्या एका परिचित महिलेची आहे. या बाईंचे
वर्तन अत्यंत विचित्र आहे. विचित्र म्हणजे यांना सतत परपुरूषांचा सहवास हवाहवासा
वाटतो. कुठेही गेल्या की, स्वतः पुढाकार घेऊन पुरूषांच्या ओळखी काढायच्या,
त्यांच्यात निष्कारण उठबस करायची, नको ते विनोद करायचे, हसतहसत टाळ्या द्यायच्या,
कुणाच्या खांद्यावर हात ठेवायचा, अशा विचित्र सवयी या बाईंना आहेत. जिथे जातील तिथे
पुढे पुढे करतील. त्यांच्या वयाला न शोभणारे कपडे परिधान करतील. साडी नेसली तर पाठ
उघडी असलेला स्लीव्हलेस ब्लाऊज, पंजाबी ड्रेस घातला तर तो स्पगेटी टॉप सारखा शरीर
उघडं टाकणारा. हेअरस्टाईल काय आणि मेकअप काय, हावभाव काय, काही विचारू नका. एकूण
परपुरूषांच्या नजरा आपल्याकडे कशा आकर्षित होतील, याचे विचार त्यांच्या डोक्यात सतत
सुरू असतात.
मोकळेपणाने वागणं बोलणं वेगळं आणि कारण नसतांना
परपुरूषांच्या अंगचटीला जाणं वेगळं. असो. तर हे असं एकंदर प्रकरण आहे. त्यांच्या या
वर्तनाने असेल पण त्यांचे आजपर्यंत दोन घटस्फोट झाले आहेत. त्यांची परपुरूषांशी
असलेली मैत्री, त्यांच्या भेटी, पार्ट्या, पिकनिक ही त्या घटस्फोटांमागची ठळक कारणं
असू शकतात. कारण कुठलाही नवरा हे असलं वर्तन खपवून घेणार नाही.
सर्वात महत्त्वाचा आणि गमतीशीर भाग असा की, हे दोन्ही घटस्फोट ज्या गुरू महादशेत झाले, तो गुरू कुठल्याही प्रकारे सहा आणि बारा या स्थानांचा कार्येश नाही. तो फक्त अष्टमस्थानाचा कार्येश आहे. अष्टमस्थान हे केवळ घरातील भांडणे दाखवतं, घटस्फोट नाही, हे आपण जाणताच.
सर्वात महत्त्वाचा आणि गमतीशीर भाग असा की, हे दोन्ही घटस्फोट ज्या गुरू महादशेत झाले, तो गुरू कुठल्याही प्रकारे सहा आणि बारा या स्थानांचा कार्येश नाही. तो फक्त अष्टमस्थानाचा कार्येश आहे. अष्टमस्थान हे केवळ घरातील भांडणे दाखवतं, घटस्फोट नाही, हे आपण जाणताच.
आमच्या ज्योतिषशिकवणीतील विद्यार्थ्यांना वैवाहिक
सौख्य शिकवतांना, आम्ही ज्या कुंडल्या पुढे ठेवतो, त्यातली ही एक आहे. वैवाहिक
सौख्य ६/१२ स्थानांच्या दशेत बिघडतं, हा फार बाळबोध नियम झाला. तो सर्व
ज्योतिषशास्त्राच्या क्लासमध्ये शिकवला जातो. पण ६/१२ न लागताही घटस्फोट कसे झाले?
हे खरं तर शिकवायला पाहिजे. पण ते कुठे शिकवलं जात नाही.
२/७/११ च्या दशेत विवाह होतो, हे ठीक आहे हो. पण २/७/११ लागूनही विवाह का नाही झाला? इथे ज्योतिषशास्त्राचा खरा अभ्यास सुरू होतो. उत्तराकडून प्रश्नाकडे जाण्याचा द्राविडी व्यासंग त्यासाठी करावा लागतो. एक एक गोष्टीवर चिंतन करत जेव्हा रात्रीच्या रात्री जाळून काढल्या जातात, तेव्हा त्यातील वर्म कळतं. " तुका म्हणे त्याचे| कळले आम्हां वर्म|" हे तेव्हा म्हणता येतं. असो.
२/७/११ च्या दशेत विवाह होतो, हे ठीक आहे हो. पण २/७/११ लागूनही विवाह का नाही झाला? इथे ज्योतिषशास्त्राचा खरा अभ्यास सुरू होतो. उत्तराकडून प्रश्नाकडे जाण्याचा द्राविडी व्यासंग त्यासाठी करावा लागतो. एक एक गोष्टीवर चिंतन करत जेव्हा रात्रीच्या रात्री जाळून काढल्या जातात, तेव्हा त्यातील वर्म कळतं. " तुका म्हणे त्याचे| कळले आम्हां वर्म|" हे तेव्हा म्हणता येतं. असो.
या पत्रिकेला २००९ पर्यंत गुरू महादशा सुरू होती. गुरू
स्वतः अष्टमात आहे इतकचं. तो भाग्यातल्या शनीच्या पुष्य नक्षत्रात आहे. शनी
द्वितीयेश आणि तृतीयेश. गुरूची दृष्टी फक्त १२ व्या स्थानावर येतेय. पण म्हणून दोन
घटस्फोट होतील असे म्हणता येणार नाही. मग असे का झाले?
या पत्रिकेतील सप्तमेश बघा. सप्तमेश बुध आहे. तो दशमात
कन्येत स्वतःच्या उच्च राशीत आहे. पण हा बुध राहुच्या अंशात्मक युतीत आहे.
पूर्वीच्या राहुबद्दलच्या लेखात तुम्ही वाचलेले तुम्हांला आठवत असेल की, जो ग्रह
राहुच्या अंशात्मक युतीत येतो, त्याचे कारकत्व आणि भावेशत्व राहु पराकोटीचे
बिघडवतो. ते सुख राहु माणसाला लाभू देत नाही. बुध सप्तमेश होऊन राहुच्या अंशात्मक
युतीत आला. राहुने सप्तमाच्या फळात बिब्बा कालवलाच. चंद्रापासूनचा सप्तमेश गुरू
आहे. तो ही स्वस्थानापासून आठवा. हा गुरू मंगळाच्या अंशात्मक केंद्रयोगात आहे.
आता या बाईंचं वर्तन असं का? आपल्या सभोवती अशा काही
व्यक्ती वावरत असतात, ज्यांचे वर्तन आपल्याला खटकतं. कारण ते चारचौघांसारखं नसतं.
औचित्याच्या मर्यादा सोडून त्या व्यक्ती वागत असतात. असले वर्तन शुक्र बिघडला
तर होते.
या कुंडलीत लाभस्थानात तूळ राशीत शुक्र आहे. लाभेश लाभात स्वगृही एवढे
म्हणून चालेल काय? तो कुठल्या परिस्थितीत आहे ते पहा. तो हर्षलच्या अंशात्मक युतीत
आहे. शुक्र हर्षल युती आणि प्रतियोग हे वैवाहिक सौख्य लाभून देत नाहीत. यांचे खरे
तर एका जोडीदारावर भागत नाही, इतकी प्रचंड कामवासना असते. जेवायला नाही मिळालं तर
चालेल, पण झोपायला सोबत पुरूष पाहिजे अशी स्थिती असते. यांना तृप्ती अशी कधीच वाटत
नाही. तसेच ही युती अनैसर्गिक संभोगाची आवड दाखवते. याला विकृती असं नाही म्हणता
येणार, पण विचित्र आवड असते हे निश्चित. तिथे शुक्र मंगळ हर्षलसोबत. आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे शुक्र हर्षल युती ही विशाखा नक्षत्रात आहे. पंचमेश
मंगळावर, लाभेश शुक्रावर शनीची सर्वात अशुभ अशी तिसरी दृष्टी आहे. चंद्रकुंडलीचा
पंचमेशही शुक्रच आहे. त्याची ही हालत.
पत्रिका कशी बिघडत जाते ते पहा.
बुध राहु युतीच्या कारकत्वाची फळेही मिळालेली आहेत. या
बाई अत्यंत खोटारड्या आणि अविश्वसनीय आहेत. यांनी आमच्या परिचयातल्याच काही
लोकांकडून पैसे घेऊन झोल केल्याची प्रकरणे घडली आहेत.
या बाईंना पाहिल्यावर नेहमी आम्हांला एक लावणी
आठवते:-
पडदा लाजचा, लाजचा फेकला.....
अशा निर्लज्ज लोकांचा सहवासही नको, असं मनापासून वाटतं.
आपला,
(सलज्ज) धोंडोपंत
(सलज्ज) धोंडोपंत



3 प्रतिसाद:
पंत, मला पत्रिकेतल फारस काही कळत नाही पण तरी पण मी केवळ या शास्त्रातल्या तुमच्या ज्ञानच आदर / कौतुक वाटत म्हणून तुमचा ब्लॉग वाचतो.
बऱ्याच दिवसांनी पोस्ट वाचून छान वाटल.
पंत एखाद्या भारी पत्रिकेबद्दल पण लिहाना - ज्या पत्रिकेत खूप शुभ गोष्टी आहेत आणि दुख अगदीच कमी आहेत.
yes i agree with this.
ekhadya changlya patrike baddal pan lihave hi vinanti....
नमस्कार पंत,
तुम्ही ज्योतिष शिकवता सुद्धा! मलाही आपल्या ज्योतिष मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे कसे ते
कळवावे.
Post a Comment